Friday, 02 Oct, 5.05 am प्रभात

मुख्य बातम्या
67 वर्षांपूर्वी प्रभात : बुधवार, ता. 2 माहे ऑक्‍टोबर सन 1953

कोरियन परिषद नवी दिल्ली येथे भरविण्यास द. कोरियाचा विरोध

रशियाला तटस्थ मानण्यास तयार नाही

सेऊल, ता. 1 - कोरियन राजकीय परिषद नवी दिल्ली येथे भरवावी ही सूचना दक्षिण कोरियास मान्य नसल्याचे परराष्ट्र मंत्री प्युंग युंग ते यांनी जाहीर केले.

रशियाला तटस्थ राष्ट्र म्हणून परिषदेत भाग घेण्यास सांगावे ह्या कम्युनिस्ट सूचनेस आपला विरोध असल्याचेही त्यांनी सांगितले. पान मून जॉन भागातून दक्षिणेकडे चोरून छपून प्रवेश करणाऱ्या कम्युनिस्टांविरुद्ध द. कोरियन सरकार उपाययोजना करणार आहे.

कोरियातील तटस्थ भाग म्हणून जाहीर झालेल्या भागांत कम्युनिस्ट पसरत आहेत. असा आरोप एका सरकारी प्रवक्‍त्याने केला.

हे कार्य आम्हीच पार पाडू……….

पान मून जॉन येथील वाटाघाटीस आम्ही पाठिंबा द्यावा असे जे आमचे मित्र आम्हाला सांगतात त्यांनी कम्युनिस्टांचा हा छुपा प्रवेश थांबविला पाहिजे.

'कम्युनिस्ट' युद्धबंद्यांचा समजावणी कार्यक्रम

पान मून जॉन, ता. 1 - भारतीय संरक्षक पथकाच्या ताब्यात असलेल्या 350 कम्युनिस्ट दोस्त युद्धबंद्यांच्या 'समजावणी' कार्यक्रमास बुधवारी सुरुवात करण्यास आपणास परवानगी द्यावी, अशी विनंती यूनो गटाने तटस्थ राष्ट्रे युद्धबंदी परती मंडळास केली आहे. ह्या युद्धबंद्यांत 327 द. कोरियन, 22 अमेरिकन आणि 1 ब्रिटिश युद्धबंदी आहे.

सेवानिवृत्त न्यायमूर्तींना वकिली करण्यास परवानगी

नवी दिल्ली, ता. 1 - सेवानिवृत्त न्यायमूर्तींना सुप्रीम कोर्टातून अगर ते हायकोर्टात वकिली करण्यास परवानगी देण्याबाबतच्या प्रश्‍नाचा भारत सरकार विचार करीत आहे असे आज उपगृहमंत्री श्री. दातार ह्यांनी प्रश्‍नोत्तराचे वेळी भारतीय लोकसभेत सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top