Wednesday, 05 Aug, 10.33 am प्रभात

ताज्या बातम्या
आमदार महेश लांडगे करणार 10 लाख लाडू वाटप

पिंपरी - रामजन्मभूमी अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाचा समारंभ होत आहे. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने तब्बल 10 लाख मोतीचूर लाडुचे वाटप करण्यात येईल. तसेच, भक्तीमय वातावरणात राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवडमधील 40 प्रमुख चौकात लाडू वाटप करण्यात येईल. इंद्रायणीनगर येथील येथे मोठ्या हॉलमध्ये दोन दिवसांपासून लाडू तयार करण्याची लगबग सुरु आहे. लाडू बनवण्यासाठी नेमण्यात आलेल्या कारागिरांची करोना चाचणी करण्यात आली आहे.

फिजिकल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करूनच लाडू तयार करण्यात येत आहेत. सर्वांनी घरातून रामजन्मभूमी पूजनाचा सोहळा साजरा करावा व आपला परिसर, राज्य व राष्ट्र राममय करावे, असे आवाहनही आमदार लांडगे यांनी केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top