Friday, 18 Oct, 9.13 am प्रभात

मुखपृष्ठ
आंतरराष्ट्रीय नेमबाजांच्या घरातून शस्त्रे जप्त

आमदार मुख्तार अन्सारींच्या मुलाच्या घरातून शस्त्रसाठा जप्त

नवी दिल्ली : आमदार मुख्तार अन्सारीचा मुलगा अब्बास अन्सारी याच्या घरातून मोठ्या शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई लखनौ पोलिसांसह दिल्ली पोलिसांनी संयुक्तपणे केली आहे. या कारवाईत देशी-विदेशी बनावटीची हत्यारे आणि काडतूसे जप्त केली आहेत. उत्तर प्रदेशातील डॉन आमदार मुख्तार अन्सारी हे सध्या कारागृहात आहेत.

याप्रकरणी पोलीस अधिकारी कलानिधी नैथानी यांनी सांगितले, 12 ऑक्‍टोबर रोजी लखनौमधील महानगर पोलीस ठाण्यात आमदार मुक्तार अन्सारीचा मुलगा अब्बास अन्सारी याच्याविरोधात शस्त्र परवाना फसवणूकप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली होती. त्यानंतर चौकशीदरम्यान पोलिसांना अब्बास हा दिल्लीत राहत असल्याचे कळले. त्यानुसार दिल्ली पोलिसांच्या मदतीने लखनौ पोलिसांनी अब्बासच्या बसंतकुंज येथील घरावर छापेमारी केली.
या संयुक्त कारवाईत अब्बासच्या घरातून इटलीची डबल बोअरची बंदूक, स्लोवेनियातून मागवलेली सिंगल बोअरची बंदूक, लखनऊमधून खरेदी केलेली साऊथ केटाफिलची मॅगझीन असलेली रायफल, दिल्लीतून खरेदी केलेली डबल बोअरची बंदूक, मेरठ येथून खरेदी केलेली अमेरिकन बनावटीची रिव्हॉलव्हर, स्लोवेनियातून आयात केलेली रायफल, सात विविध बोअरचे बॅरल, ऑस्ट्रियाची तीन पिस्तूलांची बॅरल, ऑस्ट्रियाच्या दोन मॅगझीन, एक लोडर आणि विविध बोअरचे 4,331 काडतूसे पोलिसांना आढळून आली.

दरम्यान, डॉन असलेल्या आणि आमदार बनलेल्या मुख्तार अन्सारीचा मुलगा अब्बास अन्सारी हा 'शॉट गन शुटिंग' या क्रिडाप्रकारातील आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. जगातील टॉपच्या दहा नेमबाजांमध्ये समावेश असलेला अब्बास हा केवळ नेमबाजीत राष्ट्रीय चॅम्पिअनच नाही तर जगभरातील स्पर्धांमध्ये त्याने भारताला अनेक पदकंही जिंकून दिली आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>