Sunday, 11 Mar, 1.35 am प्रभात

आरोग्यपर्व
आपटा आणि त्याचे उपयोग

आपटा ह्या झाडाची पाने दसऱ्याच्या दिवशी सोने म्हणून वाटतात. तसेच ह्याच्या पानाच्या विड्या करून त्या ओढतात.

लघवीला जळजळ, दुखत असेल तर.
लघवीच्या वेळी कळ,कंड, जळजळ होत असेल, तर आपट्याच्या पानांचा रस,आपट्याच्या पानांचा रस निघत नाही म्हणून पाणी घालून तो वाटून काढावा.हा रस 20 ग्रॅम काढून त्या रसाइतकेच दूध व साखर घालावी व हे औषध दिवसातून वयोमानाप्रमाणे चार वेळा घ्यावे. लघवी साफ सुटून सर्व विकार थांबतात. लघवीतून खर पडत असेल तर आपट्याच्या कोवळ्या तुऱ्यांचा किंवा पानांचा रस काढून 1चमचा सांजसकाळ घ्यावा, खर जाण्याची थांबते.आपट्याच्या शेंगा मूत्रल आहेत. पाण्यात उकळून साखरेबरोबर दिवसातून दोन तीन वेळ प्यायल्याने लघवीस साफ होते.

गंडमाळा, गंडरोग, गालगुंड व कंठरोग
गंडमाळा, गंडरोग, गालगुंड व कंठरोग झाला असता तसेच आपट्याच्या 40 ग्रॅम सालीचा अर्धा लिटर पाण्यात अष्टमांश काढा मंदाग्नीवर शिजवून आणि तो गार झाल्यावर मध घालून वयोमानाप्रमाणे सोसवेल एवढा प्यावा. गंड माळेवर आपट्याची साल बांधावी. गंडमाळा व गळ्याचे व्रण बरे होतात.

व्रणावर
व्रणावर आपट्याची साल बांधावी.चाळीस ग्रॅम आपट्याच्या सालीचा काढा गार झाल्यावर मध टाकून पोटात घ्यावा.त्यामुळे जीर्ण व्रण बरे होतात.

विंचू चावला असेल
विंचू चावला असेल त्याच्या चावलेल्या जागेवरून आपट्याची शाखा खाली फिरवीत न्यावे. विंचवाचे विष उतरते.

नैसर्गिक डिलीव्हरी अन् गरोदरपणात लवकर सुटका होण्यासाठी
गरोदरबाई अडली असेल तर आपट्याचे झाडास नमस्कार करून मुंज झाली नाही अशा मुलाकडून अगर लग्न झाले नाही अशा अविवाहिताकडून आपट्याची पाने काढून ती गरोदर बाईच्या अंगावरून बराच वेळ फिरवावी. ताबडतोब प्रसूत होते.

हृदयाची सूज
आपट्याच्या मुळाच्या सालीचा काथ हृदयाची सूज ओसरण्यास मदत करतो. मुळाची साल 10 ग्रॅम दोन भांडी पाण्यात उकळावी. अर्धा भांडे बाकी राहिल्यावर मिश्रण उतरवावे. मग ते गाळून प्यावे.

पोटातील मुरडा बरा होण्यासाठी
मधाबरोबर आपट्याची सुक्‍या काळ्या फुलांचे चूर्ण े 10 ग्रॅम साखरेबरोबर घेतल्यास पोटातील मुरडा बरा होतो.

कृमीनाशक
आपट्याचे बीसुद्धा उपयुक्‍त आहे. बियांचे बारीक चूर्ण करून ते गाईच्या साजूक तूपात घोटून त्याचे मलम करावे जे जीवाणूंचे तसेच कीटक दंशस्थानी लावल्यास बरे वाटते.

लहान मुलांच्या पोटात कृमी झाले तर.
आपट्याच्या बीचे घृत पोटात घ्यावे. कृमी शौचावाटे बाहेर पडण्यास मदत होते. कृमिवर पण उपयोगी आहे.
अशाप्रकारे हिंदू दसऱ्याच्या सणात विशेष महत्व असलेला आपटा आयुर्वेदियदृष्ट्यासुद्धा महत्वाचा आहे.

सुजाता गानू

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top