Sunday, 10 Nov, 7.30 am प्रभात

क्रीडा
आर्यच्या गोलंदाजीनंतरही डेक्‍कनला आघाडी

पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित दुसऱ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत पहिल्या दिवशी आर्य जाधवची भेदक गोलंदाजी व यश बांबोळी 74 धावा, आर्यन बांगले 44 धावा व यश बोरामनी 39 यांनी धावांच्या जोरावर डेक्कन जिमखाना संघाने पहिल्या डावात 229 धावा केल्या व आघाडी घेतली.

या स्पर्धेत डेक्कन जिमखाना संघाने प्रथम फलंदाजी करताना 81.4 षटकात 229 धावा केल्या. डेक्कन जिमखाना संघाचे सलामीचे फलंदाज झटपट बाद झाल्यामुळे 93 धावांत 6 गडी बाद अशा अडचणीत संघ असताना यश बांबोळीने 124 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 74 धावा, आर्यन बांगलेने 159 चेंडूत 44 धावा करून संघाचा डाव सावरला.

यश बांबोळी व आर्यन बांगले यांनी सातव्या गड्यासाठी 265 चेंडूत 122 धावांची भागीदारी केली. पीवायसीकडून आर्य जाधवने 51 धावांत 6 गडी बाद करून डेक्कन जिमखाना संघाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. आर्यला आदर्श बोथराने 28 धावात 2 गडी तर, साहिल चुरीने 40 धावात 1 गडी बाद करून सुरेख साथ दिली.

पीवायसी संघाने दिवसअखेर 12 षटकात 1 बाद 28 धावा केल्या. यात श्रेयश वालेकर नाबाद 16, तर आदर्श बोथरा 10 धावांवर खेळत आहे. डेक्कन व पीवायसी यांच्यातील अजून एक दिवसाचा खेळ बाकी आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top