Friday, 03 Jul, 4.05 pm प्रभात

मुखपृष्ठ
आता विस्तारवादाचे युग संपले; मोदींचा लेह'तुन चीनला इशारा

लेहः भारत आणि चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखमधील लेह येथे भेट दिली. त्यांनी सीमेवरील सैनिकांची भेट घेतली आणि त्यांना प्रोत्साहन दिले. तसेच त्यांनी आपल्या भाषणातून चीनला इशारा दिला. विस्तारवादाचे युग संपले. विस्तारवाद हा जागतिक शांतता आणि संपूर्ण मानवतेसाठी धोका आहे. विस्तारवादाने मानवजातीचा नाश केला. संपूर्ण जगाने विस्तारवादाच्या विरोधात आपले मन तयार केले आहे. आता ही विकासवादाची वेळ असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.

दरम्यान त्यांनी सैनिकांशी संवाद साधला 'आपले धैर्य, आई भारतीचा शौर्य व सन्मान जपण्याचे तुमचे समर्पण अतुलनीय आहे. ज्या कठीण परिस्थितीत तुम्ही या उंचीवर भारताची ढाल बनून तिचे रक्षण करता. याची तुलना विश्वात कुठंच होऊ शकत नाही. आपण जिथे उभे आहात त्या उंचीपेक्षा आपले धैर्य जास्त आहे. तुमचे बाहू इथल्या पर्वतरांगांसारखेच बळकट आहे. तुमची इच्छाशक्तीही अटळ आहे, मी हा सगळा अनुभव घेतो आहे.

त्याचंच प्रतिबिंब माझ्या भाषणात शब्दरुपाने उतरलं आहे' असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी जवानांचं मनोबल बाढवण्याचा प्रयत्न केला. तसंच सीमाभागात पायाभूत सुविधांसाठी पूर्वीपेक्षा तीन पट अधिक खर्च करत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी राष्ट्र कवी रामधारीसिंग दिनकर यांच्या कवितेतील काही ओळी म्हटल्या, 'राष्ट्रकवी रामधारीसिंग दिनकर जी यांनी असे लिहिले आहे…

जिनके सिंहनाद से सहमी
धरती रही अभी तक डोल,
कलम, आज उनकी जय बोल.
मैं आज अपनी वाणी से आपकी जय बोलता हूं…

नरेंद्र मोदी समोर म्हणाले, आजगलवान खोऱ्यात शहीद झालेल्या सैनिकांना मी श्रद्धांजली वाहतो. त्याचे सामर्थ्य, त्यांच्या पराक्रमामुळे पृथ्वी अजूनही त्यांच्यावर जयजयकार करीत आहे. आज प्रत्येक देशवासीय तुमच्यासमोर आदरपूर्वक नतमस्तक झाले. आज प्रत्येक भारतीयांची छाती तुमच्या शौर्याने आणि पराक्रमाने फुलली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top