Friday, 22 Jan, 9.28 pm प्रभात

ताज्या बातम्या
आठ दिवसांत 15 पक्ष्यांचा मृत्यू

पिंपरी - देशातील सुमारे तेरा राज्यात बर्ड फ्लू या आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे भीतीचे वातावरण आहे. पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या आठ दिवसांत 15 पक्ष्यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मृत्यू मागील कारण अजून स्पष्ट झालेले नाही. तरीही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. त्याचे अहवाल येण्यास आठ दिवस लागणार आहेत.

करोनाच्या संकटातून सावरत असताना बर्ड फ्लू या आजाराने नागरिकांना पुन्हा चिंतेत टाकले आहे. देशातील काही राज्यांत बर्ड फ्लू चा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या आठ दिवसांत 4 कावळे व 11 पारवे आणि कबूतर मृत झाल्याची माहिती महापालिका पशू वैद्यकीय विभागाकडून मिळाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी, भोसरे, निगडी, मोशी व अन्य ठिकाणी पक्षी मृत झाले आहेत. मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अजून स्पष्ट झाले नसून मृत पक्षाचे नमुने तपासणीसाठी पुण्यात पाठवण्यात आले आहेत.

पक्ष्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्टपणे सांगता येत नाही. मात्र, प्राथमिक पाहणीत बर्ड फ्लूची शक्‍यता वाटत नाही. मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी पक्ष्यांचे नमुने पुण्यात पाठवण्यात आले आहेत. तपासणी अहवाल यायला अंदाजे आठ दिवस लागू शकतात. त्यानंतर नक्‍की काय ते समजू शकेल.
- डॉ. अरुण दगडे, महापालिका पशूवैद्यकीय अधिकारी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top