Dailyhunt
आठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून

आठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून

प्रभात 6 years ago

फुगेवाडी येथील घटना

पिंपरी: आठ महिन्याच्या गरोदर पत्नीच्या गळ्यावर टणक वस्तूने प्रहार करून तिचा खून करण्यात आला. ही घटना फुगेवाडी येथे रविवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली. पूजा गोपाळ घेवंदे (वय २३, फुगेवाडी) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे . या घटनेनंतर पतीने आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास फुगेवाडी येथील मजुरांसाठी उभारण्यात आलेल्या झोपडीमध्ये हा प्रकार घडला. मयत पूजा या आज सकाळीच गावावरून फुगेवाडी येथील आपल्या घरी आल्या होत्या.

त्यांना सोडवण्यासाठी त्यांची आई देखील गावाहून आली होती. पूजा या स्वयंपाक करत असताना आरोपी पतीने अचानक हल्ला करून जीवे ठार मारले. त्यानंतर स्वतः ब्लेडने वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला.

पूजा यांच्यावर किरकोळ स्वरुपाचे वार आहेत. मात्र गळ्यावर टणक वस्तूने प्रहार केल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat