Thursday, 04 Mar, 9.21 am प्रभात

मुखपृष्ठ
आयकर विभागाकडून तापसी आणि अनुरागची रात्रभर चौकशी; वाचा सविस्तर बातमी.

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री 'तापसी पन्नू' आणि प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप, तसेच 'क्वीन' चित्रपटाचा निर्माता विकास बेहेल यांच्या घरावर आणि मालमत्तांवर काल (दि. ३) प्राप्तिकर विभागानं धाड टाकली. सध्या पुणे आणि मुंबईत तब्ब्ल २२ ठिकाणांवर हे धाडसत्र सुरु आहे.

दरम्यान, कलाकारांच्या घरावर अचानक पडलेल्या या धाडीने बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही छापेमारी रात्रभर सुरु होती. यादरम्यान तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप यांची पुण्यात चौकशीही झाली. आयकरची छापेमारी कायदेशीररित्या झाली आहे असं केंद्र सरकारने सांगितलं तर काँग्रेस, राष्ट्रवादीने ही कारवाई सूडबुद्धीने केल्याचा आरोप केला आहे. मात्र, आता या छापासत्रातून अनेक मोठी नावं पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

२०१५ मध्ये आलेल्या फँटम चित्रपटाशी संबंधित ही छापेमारी करण्यात आली आहे. आयकर विभागाला माहिती मिळाली होती की फँटम चित्रपटाच्या कमाईत टॅक्सची चोरी झाली होती. त्यामुळे अनुराग कश्यप, तापसी पन्नू आणि दिग्दर्शक विकास बहल त्यांच्या घरावर अचानक धाड मारली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top