Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Abhijeet Dipke : बळाचा वापर करण्याचे आदेश शहांनीच दिले असणार; अभिजीत दिपके यांचा दावा

Abhijeet Dipke : बळाचा वापर करण्याचे आदेश शहांनीच दिले असणार; अभिजीत दिपके यांचा दावा

Abhijeet Dipke : नवी दिल्लीत संसद चलो मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडूनच आले असणार, असा दावा कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके(Abhijeet Dipke) यांनी गुरुवारी केला.

तसेच, पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही दिपके यांनी केली.

नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून जंतर-मंतर येथे सीजेपीच्या आंदोलनानंतर ते घरी परतले होते. पत्रकारांशी बोलताना दिपके म्हणाले, देशात लोकशाही धोक्यात आली आहे. न्यायव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्याच वेळी राजकीय पक्ष फोडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. लोकशाही वाचवणे हा आता केवळ विरोधी पक्षांचा मुद्दा राहिलेला नाही. त्यासाठी देशातील जनतेला एकत्र यावे लागेल, असे दिपके (Abhijeet Dipke) यांनी म्हटले.

त्यांनी प्रल्हाद जोशी यांची नवीन शिक्षण मंत्री म्हणून करण्यात आलेल्या नियुक्तीवर टीका केली. जर देशाचे शिक्षण मंत्रीच बलात्कार करणाऱ्यांचे समर्थन करत असतील, तर याचा अर्थ धर्मेंद्र प्रधान यांना हटवून आणखी एका विचित्र माणसाला तिथे आणले गेले आहे.

देशाला कोणता संदेश दिला जात आहे? ते दुसरे काहीच करू शकत नाहीत कारण त्यांचा पक्ष गुंडांनी भरलेला आहे. त्यांच्या कार्यकाळात राम रहीमसारखी माणसे पॅरोलवर बाहेर येतात. हे सरकार गुंड आणि बलात्कार करणाऱ्यांना पाठिंबा देते, असा आरोप त्यांनी केला.

जंतरमंतरवरील आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या जनरेशन झेडने भारताच्या संस्कृतीची बदनामी केली आहे, या योगगुरू रामदेव यांच्या विधानाबद्दल विचारले असता, दिपके यांनी त्यांच्यावर टीका केली. आम्ही पेपरफुटीविरुद्ध आमच्या हक्कांसाठी घटनात्मक मार्गाने लढा दिला आहे.

जर महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो घेऊन कायदेशीर मार्गाने आंदोलन करणे म्हणजे संस्कृतीची बदनामी असेल, तर आम्ही ती केली आहे. बाबा रामदेव यांनी पतंजलीकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी म्हटले.

शेतकऱ्यांच्या आंदोलनांच्या पाठीशी उभे राहू
शेतकऱ्यांना त्यांच्या आंदोलनांमध्ये सीजेपीच्या पाठिंब्याची गरज भासल्यास आपण त्यांच्या पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही दिपके (Abhijeet Dipke) यांनी दिली. शेतकऱ्यांनाही वाटते की त्यांच्या मुलांनी यशस्वी करिअर करावे. यापूर्वी त्यांनी आमच्या आंदोलनात आम्हाला साथ दिली होती. जर शेतकरी नेत्यांना आमच्या पाठिंब्याची गरज असेल, तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू. जिथे जिथे शेतकऱ्यांना आमची गरज असेल, तिथे आम्ही त्यांच्यासोबत असू.

मी स्वतः एका शेतकरी कुटुंबातील आहे. आमच्यापैकी अनेकजण शेतकरी कुटुंबांतून आले आहेत, असे दिपके म्हणाले. तसेच, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शहा यांच्या राजीनाम्याची जी मागणी केली होती, त्याला त्यांनी पाठिंबा दिला. शहा यांनी नक्कीच राजीनामा दिला पाहिजे, असे दिपके यांनी म्हटले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat