Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Abhijeet Dipke : मोदींनी त्यांची पदवी दाखवल्यास मी माझे शिष्यवृत्तीचे पत्र दाखवेन; दीपकेंच पंतप्रधानांना आव्हान

Abhijeet Dipke : मोदींनी त्यांची पदवी दाखवल्यास मी माझे शिष्यवृत्तीचे पत्र दाखवेन; दीपकेंच पंतप्रधानांना आव्हान

प्रभात 1 month ago

Abhijeet Dipke : जर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची पदवी सार्वजनिक केली, तर मी अमेरिकेतील शिक्षणासाठी मिळालेली शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्ज मंजुरीची पत्रे दाखवण्यास तयार आहे, असे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके(Abhijeet Dipke) यांनी सोमवारी म्हटले.

सुरत येथील एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी दिपके (Abhijeet Dipke) यांचे वडील, जे एक निवृत्त सरकारी कर्मचारी आहेत आणि ज्यांनी आपल्या मुलाला शिक्षणासाठी परदेशात पाठवले होते, त्यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली होती. दिपके यांनी सांगितले की, मला माझ्या शिक्षणासाठी बोस्टन युनिव्हर्सिटीकडून शिष्यवृत्ती मिळाली आहे.

तसेच, तिथे शिकण्यासाठी मी शैक्षणिक कर्जही घेतले होते. त्याची परतफेड करायची आहे. कोणालाही चौकशी करण्याचे स्वातंत्र्य आहे. मी माझ्या पदवीसोबतच शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जाची पत्रे दाखवण्यास तयार आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांची पदवी दाखवावी आणि ती सार्वजनिक करावी. त्यांनी तसे केल्यास, मी माझी कागदपत्रे सार्वजनिक करण्यास तयार आहे, असे दिपके म्हणाले.

जेव्हा जेव्हा लोक या सरकारविरुद्ध आवाज उठवतात, तेव्हा ते ईडी आणि सीबीआयला पाठवू लागतात. त्यांना माझ्या घरी येऊ द्या आणि चौकशी करू द्या. मी माझी पत्रे दाखवण्यास तयार आहे, पण जर पंतप्रधान ईडीला पाठवत असतील, तर त्यांनी त्यांची पदवीही पाठवावी आणि ती सार्वजनिक करावी. माझी पदवी अस्सल आहे आणि मला अपेक्षा आहे की मोदींची पदवीही अस्सल असेल, असेही त्यांनी नमूद केले.

सीजेपी हा राजकीय पक्ष बनेल का, या प्रश्नावर दिपके म्हणाले, मला वाटते की प्रसारमाध्यमे सध्याच्या राजकीय पक्षांमुळे निराश झाली आहेत. सध्या तरी आमचा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा कोणताही विचार नाही आणि आम्हाला ही एक जन चळवळ म्हणूनच पुढे चालू ठेवायची आहे.

जेव्हा मतेच चोरली जातात, तेव्हा राजकीय पक्ष स्थापन करून काय उपयोग? लोकांचा राजकारणावरील विश्वास उडत चालला आहे, कारण सकाळी ते एकाला मतदान करतात आणि संध्याकाळी मात्र दुसऱ्याचेच सरकार सत्तेवर येते.

आमदार आणि खासदार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारतात. ईडी आणि सीबीआय यांचा वापर करून जेव्हा पक्षच फोडले जातात, तेव्हा राजकीय पक्ष स्थापन करण्यात काय अर्थ आहे? असे दिपके (Abhijeet Dipke) म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat