Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Abhijit Deepke Complaint: 'पाकिस्तानी एजंट' म्हणत अभिजित दीपकेविरोधात दिल्लीत तक्रार ; प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरकडून अटकेची मागणी

Abhijit Deepke Complaint: 'पाकिस्तानी एजंट' म्हणत अभिजित दीपकेविरोधात दिल्लीत तक्रार ; प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरकडून अटकेची मागणी

Abhijit Deepke Complaint: नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर-मंतर याठिकाणी झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर कॉक्रोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजित दीपके चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

आंदोलनानंतर CJP च्या भूमिकेबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू असतानाच आता अभिजित दीपके यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Abhijit Deepke Complaint)

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारी यांनी ही तक्रार सादर केली असून दीपके यांच्या विरोधात एफआयआर नोंदवून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

डीसीपी कार्यालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अन्सारी यांनी दावा केला की, दीपके यांच्या समर्थकांकडून त्यांच्यावर दोन वेळा हल्ला करण्यात आला. पुणे आणि औरंगाबाद याठिकाणी घडलेल्या या कथित घटनांबाबत स्थानिक पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले. (Abhijit Deepke Complaint)

तक्रारीमध्ये अभिजित दीपके यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यात त्यांना पाकिस्तानी एजंट तसेच उमर खालिद यांचे समर्थक असल्याचा दावा करण्यात आला आहे.

याशिवाय, जंतर-मंतर येथील आंदोलनात काही बॉलिवूड सेलिब्रिटींना आर्थिक मोबदला देऊन सहभागी करून घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे. मात्र, या सर्व आरोपांना अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. (Abhijit Deepke Complaint)

फैजान अन्सारी यांनी दीपके यांच्याविरोधात त्वरित कारवाई न झाल्यास देशातील वातावरण बिघडू शकते, असा दावाही केला. तसेच आंदोलनात सहभागी झालेल्या काही सेलिब्रिटींना पैसे देण्यात आल्याचा आरोप त्यांनी पुन्हा केला. मात्र , या दाव्यांच्या समर्थनार्थ कोणतेही अधिकृत पुरावे समोर आलेले नाहीत आणि संबंधित व्यक्तींनीही यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान, या प्रकरणावर दिल्ली पोलिसांनी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. तसेच अभिजित दीपके यांनीही त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत सार्वजनिक भूमिका मांडलेली नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat