Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Accident News : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; कंटेनरला कारची जोरदार धडक, 2 ठार

Accident News : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; कंटेनरला कारची जोरदार धडक, 2 ठार

Accident News : राज्यातील अपघात सत्र सुरूच असून, आता मुंबई-गोवा महामार्गवर भीषण अपघात झाला असून अपघातात दोघे जागीच ठार झाले असून दोन जण जखमी असल्याची माहिती आहे. (Accident News)

माहितीनुसार, रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला कारने पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला.

या अपघातात कारचा चेंदामेंदा झाला आहे. मुबंई-गोवा महामार्गवर पोलादपूर तालुक्यात लोहारमाळ गावाच्या हद्दीतील ही घटना घडली आहे. (Accident News)

या अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दापोली कृषी विद्यापीठ येथे कार्यरत असलेले कर्मचारी अनिल मारकड हे कुटुंबासह नगर येथून दापोलीला जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला. या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (Accident News)

कारमधील मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शवविच्छदेनासाठी पाठवण्यात आले आहेत. अपघातातील जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. (Accident News)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat