Thursday, 06 Aug, 9.24 am प्रभात

ताज्या बातम्या
ऐतिहासिक दिनी छत्रपती शिवाजी महाराज मार्ग नामकरण

शेवगाव -आज अयोध्येत झालेला श्री राम मंदिर भूमिपूजन अभूतपूर्व सोहळा संपूर्ण भारतवर्षासाठी आठवणीत रहाणार आहे. या ऐतिहासिक प्रसंगाचे औचित्य साधून शेवगावाच्या बाजारपेठेतील मुख्य रस्त्याला हिंदवी स्वराज्याचे जनक, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग असे नामकरण करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व श्री राम नामाचा जयघोष करण्यात आला.

हिंदूत्वावादी संघटना, ज्येष्ठ ग्रामस्थ तसेच काही पक्षिय कार्यकर्त्यांनी हा उपक्रम राबविला. छत्रपती शिवाजी महाराज एक द्रष्टे, स्वातंत्र्य योद्धे, संघटक, स्फुर्तिदाते, युगपुरुषोत्त्तम होते. अशा अखंड महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव उगाच एखाद्या उपनगरातील रस्त्याला न देता बाजारपेठेलीत मुख्य रस्त्यालाच देणे.

योग्य असल्याने हिंदुत्ववादी संघटना, मनसे, भाजप यांनी क्रांतीचौक छत्रपती शिवाजी पुतळा ते भगतसिंग चौक या रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराज मार्ग असे नामकरण केले आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व श्री रामाच्या जयघोषाच्या घोषणा देण्यात आल्या.

यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे, भाजपाचे तालुका अध्यक्ष ताराचंद लोढे, शहराध्यक्ष रविंद्र सुरवसे, सुनिल रासने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, मनसेचे सुनिल काथवटे, विश्‍व हिंदू परिषदेचे केशव भुजबळ, ज्ञानेश्‍वर कुसळकर, अमोल पालवे, देविदास हुशार, राहुल बंब, बाळा वाघ, नवनाथ डाके, विलास सुरवसे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. नीरज लांडे, जगदीश धूत, विजय धनवडे, विनोद ठाणगे, नितीन भाडाईत, ओमप्रकाश देहाडराय, किरण काथवटे.

नगरसेवक कमलेश गांधी, महेश फलके, अमोल घोलप, गंगा खेडकर, जगदीश मानधने, विठ्ठल बीडे, संतोष कंगणकर,विजय नजन, संकेत साळुंखे, मंदार मुळे, महेश आर्य, दत्तात्रय देहाडराय, दिपक आहुजा,पप्पू गर्जे, पोपटराव भाडाईत, विकी रासने, गणेश कंळबे, गणेश भागवत यांच्यासह नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top