Dailyhunt
Akluj News : अकलूजमध्ये पोलिसांचा दणका! शिवजयंतीत डीजे-लेझरचा धिंगाणा घालणाऱ्या ११ मंडळांवर गुन्हा

Akluj News : अकलूजमध्ये पोलिसांचा दणका! शिवजयंतीत डीजे-लेझरचा धिंगाणा घालणाऱ्या ११ मंडळांवर गुन्हा

प्रभात 2 months ago

Akluj News -शिवजयंती उत्सवाच्या मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचे नियम मोडून मोठ्या आवाजात डीजे आणि लेझर शो लावणाऱ्या अकलूजमधील ११ मंडळांसह संबंधित डीजे मालकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

प्रशासनाच्या आवाहनाकडे वारंवार दुर्लक्ष करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी ही कडक कारवाई करण्यात आली आहे.

सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांनी मिरवणुकीपूर्वी बैठका घेऊन पारंपारिक वाद्यांचा वापर करण्याचे आवाहन केले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांनी स्थानिक मंडळांना नोटिसा बजावून ध्वनी प्रदूषण टाळण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या होत्या.

मात्र, २० फेब्रुवारी रोजी झालेल्या मिरवणुकीत अनेक मंडळांनी या मर्यादा ओलांडल्याचे समोर आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३, ध्वनी प्रदूषण अधिनियम २००० आणि पर्यावरण संरक्षण अधिनियमातील कलमान्वये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

प्रशासनाने सामाजिक उपक्रम राबवून उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते, मात्र तरीही नियमांचे उल्लंघन झाल्याने संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी कारवाई केली असली, तरी असे धाडस करणाऱ्यांना कोणाचे अभय आहे? हा खरा प्रश्न आहे. ध्वनी प्रदूषण त्रस्त झालेल्या जनतेला नेतेमंडळी या जाचातून मुक्त करतील का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat