Auto-rickshaw travel : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षाने प्रवास करणाऱ्यांच्या आता खिशाला कात्री बसणार आहे. कारण येत्या १ सप्टेंबरपासून रिक्षा प्रवास महागणार आहे.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (RTO) या अधिकच्या भाडेवाढीला अधिकृतपाने मंजुरी दिली आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला अशे. त्यामुळे आता पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षाने प्रवास करणे महागणार असल्याचे दिसत आहे.
नवे रिक्षा दर कसे असणार ? (Auto-rickshaw travel )
नव्याने जाहीर करण्यात आलेल्या दरवाढीनुसार प्रवाशांना आता पहिल्या दीड किलोमीटरच्या टप्प्यासाठी अगोदर २५ रुपये मोजावे लागत होते पण आता यासाठी तब्बल ३० रुपये मोजावे लागणार आहेत.
म्हणजेच पहिल्या टप्प्यात थेट ५ रुपयांची भरघोस वाढ करण्यात आली आहे. त्यापुढील प्रति किलोमीटर प्रवासासाठी आधी १७ रुपये आकारले जात होते, तो दर आता २० रुपये प्रति किलोमीटर करण्यात आला आहे.
रिक्षा चालकांना मोठा दिलासा (Auto-rickshaw travel )
मागील काही दिवसांपासून वाढलेली इंधनदराची महागाई आणि रिक्षाच्या देखभालीचा खर्च लक्षात घेता रिक्षा संघटनांकडून भाडेवाढीची मागणी केली जात होती. तीच मागणी आता प्रशासनाकडून मान्य करण्यात आली आहे.
प्रशासनाच्या या निर्णयामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील हजारो रिक्षाचालकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. १ सप्टेंबरपासून या नवीन भाडेदरांची अमलबजावणी संपूर्ण शहरात केली जाणार आहे.

