मुंबई - काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यामुळे 14 फेब्रुवारी 2019 हा दिवस भारताच्या इतिहासातील काळा दिवस मानला जात आहे. या हल्ल्यात अनेक भारतीय जवान मरण पावले आणि त्यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला. त्यानंतर बारा दिवसानंतर भारतीय वायुसेनेने भारत-पाकिस्तानमधील नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवाद्यांच्या छावण्यांवर बॉम्ब्सचा वर्षाव केला.

