Dailyhunt
Baramati Byelection 2026:  काँग्रेसचे आकाश मोरे बारामती पोटनिवडणूकीसाठी रिंगणात; सुनेत्रा पवारांविरोधात माघार घेण्यासाठी ठेवली मोठी अट

Baramati Byelection 2026: काँग्रेसचे आकाश मोरे बारामती पोटनिवडणूकीसाठी रिंगणात; सुनेत्रा पवारांविरोधात माघार घेण्यासाठी ठेवली मोठी अट

Baramati Byelection 2026 : अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीकरिता काँग्रेस पक्षाने आकाश विजय मोरे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे.

ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी महायुतीकडून अनेक प्रयत्न करण्यात आले.

सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करुन पाठिंबा देण्याची विनंती केली होती. अखेर काँग्रेस पक्षाने सर्वसामान्य कार्यकर्त्याला रिंगणात उतरवून डाव पालटला आहे. Baramati Byelection 2026

रविवारी रात्री राजधानी नवी दिल्लीतून पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या आदेशाने आकाश विजय मोरे यांना उमेदवारी दिल्याचे जाहीर केले. बारामती विधानसभेतील धनगर मतांना डोळ्यासमोर ठेवून मोरे यांच्या रूपाने काँग्रेसने ‘धनगर कार्ड’ खेळल्याचीही चर्चा आहे.

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्याकडूनही उमेदवारी अर्ज भरला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बारामती पोटनिवडणुकीत 20 पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात असतील.

आकाश मोरे यांनी उमेदवारी जाहीर होताच काँग्रेस पक्षाचे आभार मानले. “बारामतीत अनेक मुद्दे आहेत. त्यातील अनेक मुद्द्यांपैकी समाजहिताच्या प्रश्नांवर मी निवडणूक लढवणार आहे. लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत असून, अजित पवार यांच्या अपघाताचा प्रश्न आहे. Baramati Byelection 2026

…तर माझी उमेदवारी मागे घेईन Baramati Byelection 2026

पण कित्येकांनी प्रयत्न करूनही राज्य सरकारने अद्याप त्याअनुषंगाने गुन्ह्याची नोंद केलेली नाही. जर राज्य सरकारने अजित पवार यांच्या अपघाताच्या अनुषंगाने गुन्हा दाखल केला तर माझी उमेदवारी मागे घेईन,” अशी अट आकाश विजय मोरे यांनी महायुतीला घातली.

सध्याच्या घडीला बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचे पारडे जड मानले जात आहे. मात्र, धनगर आणि ओबीसी मतांचे समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजित पवार हे बारामतीमध्ये कायम मोठ्या मताधिक्याने निवडून येत असे. बारामती हा पवार घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो.

दरम्यान, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्याकडूनही उमेदवारी अर्ज भरला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बारामती पोटनिवडणुकीत 20 पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात असतील.

23 एप्रिल रोजी मतदान

बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होईल. त्यानंतर 4 मे रोजी बारामतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल.

कोण आहे आकाश मोरे?

आकाश मोरे हे काँग्रेसचे माजी आमदार विजय मोरे यांचे चिरंजीव आहेत. आकाश मोरे यांचे वडील विजय मोरे विधानपरिषदेवर आमदार होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ते सचिव आहेत आकाश मोरे हे बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागातील चेहरा आहे. २०१४ साली साली अजित पवार यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढविली होती.

बारामतीमध्ये धनगर समाजाचं निर्णायक मतदान आहे, त्यामुळे काँग्रेसने यावेळी धनगर समाजाचे असलेल्या आकाश मोरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. बारामतीमध्ये धनगर समाजाचं मतदान जास्त असल्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. Baramati Byelection 2026

PMRDA News : पीएमआरडीएचा स्ट्रक्चर प्लॅन कागदावरच! ६ महिन्यांची मुदत, २ महिने उलटले; कामाला मुहूर्त कधी?

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat