Thursday, 23 Jan, 8.49 am प्रभात

महाराष्ट्र
बारामतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

बारामती - बारामतीत शिक्षणाच्या निमित्ताने राहणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एका तरुणावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. 1 एप्रिल 2019 ते 15 जानेवारी 2020 या कालावधीत भिगवण व बारामतीतील एका लॉजवर ही घटना घडली, अशी माहिती पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी दिली.

विशाल सुनील महाजन (वय20, रा. बागेचीवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर मूळच्या इंदापूरच्या असलेल्या महिलेने याबाबत फिर्याद दाखल केली. याबाबतची माहिती अशी की, फिर्यादी ही अल्पवयीन असल्याचे माहीत असताना भुलथापा देत, प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत तिच्यासी जबरदस्तीने शरीरसंबंध केले.

15 जानेवारी रोजी तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवत तिला जेजुरी येथे नेले. तेथे तिच्या डोक्‍यात कुंकू भरत सोबत फोटो काढत ते व्हाटस्‌ऍप स्टेटसवर टाकत तिच्याकडे वारंवार शरीरसंबंधाची मागणी करत फिर्यादीच्या मोबाइलवर वारंवार संपर्क साधल्याचे फिर्यादित नमूद केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top