Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बारामतीत कोरोना रुग्णांच्या संख्येत होतेय वाढ ; नागरिकांबरोबर प्रशासनही चिंतेत

बारामतीत कोरोना रुग्णांच्या संख्येत होतेय वाढ ; नागरिकांबरोबर प्रशासनही चिंतेत

प्रभात 5 years ago

जळोची : बारामतीतील करोना बाधितांच्या संपर्कातील एकूण ६९ जणांपैकी पाचजणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

आज सकाळी 3 जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आज दुपारपर्यंत उर्वरित अहवालांमध्ये आणखी दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. काल व आज मिळून बारामतीत २३ जणांना कोरोनाची बाधा झाली असून, दरम्यान २२ जणांचा अहवाल अद्याप प्रतिक्षेत असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली.

बारामतीत कालपासून कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडण्याची गेल्या पाच महिन्यातील ही पहिलीच वेळ असल्याने नागरिकांबरोबर प्रशासनही चिंतेत आहे.

आज सकाळी शहरातील एका ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिकास कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले, तर गुनवडी चौकातील शाहू कॉम्प्लेक्समधील कोरोनाबाधिताच्या संपर्कातील महिलेसही कोरोनाची लागण झाली.

त्यांच्यासह तीन जणांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर दुपारपर्यंत ४७ जणांचे
अहवाल पूर्ण झाले, त्यामध्ये पुन्हा नव्याने दोन जणांना करोनाची बाधा झाल्याचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी स्पष्ट केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat