Sunday, 05 Jul, 4.05 pm प्रभात

मुख्य बातम्या
बारामतीतील 'त्या' रुग्णांच्या संपर्कातील ५४ जणांचे स्वॅब तपासणीसाठी

जळोची : बारामतीत काल एकाच दिवशी 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने प्रशासनासह बारामतीकरांची चिंता वाढली आहे. दरम्यान या ५ रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ५४ जणांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या अशोकनगर मधील एका महिलेसह शहरातील १ तरुण व तांबेनगर मधील १ रहिवाशी तसेच कोरोनाबाधित अभियंत्याचे बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील एक मित्र व पुणेे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुणेे शाखेत कार्यरत असलेला सावळ येथील एक कर्मचारी असे ५ जण कोरोना बाधित झाल्याचेे काल निष्पन्न झाले आहे. आज त्यांच्या संपर्कातील ५४ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

दरम्यान शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विनाकारण घराबाहेर पडू नये, आवश्यक असेल तरच मास्कचा व सँनीटायझर चा वापर करावा, विनाकारण गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top