Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Basant Kumar Ponwar : जंगल वॉरफेअरचे शिल्पकार ब्रिगेडियर बसंत कुमार पोंवार यांचे निधन

Basant Kumar Ponwar : जंगल वॉरफेअरचे शिल्पकार ब्रिगेडियर बसंत कुमार पोंवार यांचे निधन

प्रभात 1 month ago

Basant Kumar Ponwar : १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील पराक्रमी योद्धे आणि देशातील नक्षलवादाविरुद्धच्या आधुनिक जंगल वॉरफेअरचे (गनिमी कावा युद्धपद्धती) शिल्पकार निवृत्त ब्रिगेडियर बसंत कुमार पोंवार (वय ७७) यांचे निधन(Basant Kumar Ponwar) झाले.

पोंवार यांच्या पश्चात त्यांची आई देविका पोनवार आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांची दोन्ही मुले सध्या भारतीय सैन्यात सेवा बजावत आहेत.

पोंवार (Basant Kumar Ponwar) यांचा जन्म ३ मार्च १९४९ रोजी इंदूर येथे झाला. डिसेंबर १९६९ मध्ये ते मराठा लाईट इन्फंट्रीच्या पहिल्या बटालियनमध्ये रुजू झाले. १९७१ च्या युद्धादरम्यान ९५ माउंटन ब्रिगेडमध्ये कार्यरत असताना त्यांनी मुक्तिवाहिनीच्या सैनिकांसोबत शत्रूच्या ठिकाणांवर छापे टाकले. ऐतिहासिक टांगेल पॅराड्रॉप आणि ढाक्याच्या दिशेने झालेल्या सैन्याच्या घोडदौडीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

आपल्या ३६ वर्षांच्या लष्करी सेवेत त्यांनी १ एमएलआयचे नेतृत्व केले. त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना अति विशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले होते. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर छत्तीसगड सरकारने त्यांची (Basant Kumar Ponwar) पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती केली. ऑगस्ट २००५ मध्ये त्यांनी उत्तर बस्तरमधील कांकेर येथे काउंटर टेररिझम अँड जंगल वॉरफेअर कॉलेजची स्थापना केली.

गनिमासारखेच गनिमाशी लढा या आपल्या प्रसिद्ध रणघोषाच्या आधारे त्यांनी १८ वर्षे या संस्थेचे नेतृत्व केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध राज्य पोलीस आणि केंद्रीय निमलष्करी दलांच्या ३७,००० हून अधिक जवानांना नक्षलविरोधी गनिमी युद्धाचे प्रशिक्षण देण्यात आले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat