Wednesday, 15 Sep, 8.48 am प्रभात

ताज्या बातम्या
बेयर ग्रिल्स सिंघमचा रोमांचक प्रवास

बेयर ग्रिल्स हा रोमांच आणि ऍक्‍शनने भरपूर कारनाम्यांसह भीतीदायक वातावरणात जिंवत राहण्यासाठी ओळखला जातो. बेयर ग्रिल्सचा 'इंटू द वाइल्ड विद बेयर ग्रिल्स'चा प्रत्येक शो पाहण्यासाठी चाहते कायम उत्साहित असतात.

या शोमध्ये बेयर ग्रिल्ससोबत अनेक जगप्रसिद्ध सेलिब्रिटी कोणतीही सुविधा नसताना जंगलातून प्रवास करताना दिसले आहेत. या शोमध्ये बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि रजनीकांतही झळकले होते. आता अभिनेता अजय देवगणदेखील बेयर ग्रिल्ससोबत जंगलातून रोमांचक प्रवास करताना दिसणार आहे. या भागाचे शूटिंग मालदीव येथे करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

अजय देवगण हा रविवारी शूटिंगसाठी मालदीवला रवाना झालेला आहे. अक्षय कुमार आणि रजनीकांतनंतर तो बॉलीवूडमधील तिसरा अभिनेता आहे, जो बेयर ग्रिल्सच्या शोमध्ये काम करत आहे. दरम्यान, हा एपिसोड कधी प्रसारित होणार याची तारीख निश्‍चित करण्यात आलेली नाही; पंरतु त्याचा प्रीमियर लवकरच डिस्कवरी प्लस ऍपवर रिलीज करण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top