Sunday, 24 Jan, 10.56 am प्रभात

मुख्य बातम्या
भाजप - मनसेचा ठाकरे सरकारला पाडण्यासाठी प्लॅन A तयार ?

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. लाड हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे भाजपा आणि मनसे जवळ येण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे मत मुंबई पालिकेतील निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर व्यक्त होत आहे. लाड यांनी राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. या दोन्ही नेत्यांत पाऊण तास चर्चा झाली.

या भेटीनंतर मनसेशी भाजप युती करणार का? असा सवाल लाड यांना पत्रकारांनी विचारला असता, त्यावर 'आगे आगे देखो होता है क्या' अशी प्रतिक्रिया देतं, आगामी महापालिका निवडणुकीत मनसेला सोबत घेण्याचे संकेत दिले. तसेच येत्या काळात भाजप - मनसेचा ठाकरे सरकारला पाडण्यासाठी प्लॅन A तयार आहे असंही त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले.

दरम्यान, पालिकेवर भाजपाचा झेंडा फडकावण्याचा पक्षाचा निर्धार आहे. शिवसेनेची परंपरागत सत्ता खाली करण्यासाठी शक्‍य ते सर्व करु, असे सांगितल्याने या भेटीकडे राजकीय निरीक्षक वेगळ्या नजरेने पाहू लागले. येत्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भाजपा आणि मनसेची जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे. त्यांच्या या भेटीमुळे असा प्रश्‍न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. शिवसेना आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्यावरुन शिवसेनेची कोंडी करण्याची भाजपा-मनसेची रणनीती असू शकते.

तसेच

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top