शहरासाठी उचलले जाणार 167 दशलक्ष लिटर पाणी पिंपरी - महापालिकेच्या वतीने आंद्रा धरणापाठोपाठ आता भामा आसखेड धरणातून पाणी उचलण्यासाठी आवश्यक प्राथमिक कामाला सुरवात झाली आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक जलवाहिन्या टाकण्यासाठी 162 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. पुढील अडीच वर्षांमध्ये हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. भामा आसखेड धरणातून शहरासाठी 167 दशलक्ष लिटर इतके पाणी उचलण्यात येणार आहे. भामा आसखेड धरणापासून नवलाख उंब्रे आणि तेथून देहू बंधारा अशा एकूण 26 किलोमीटरच्या अंतरात जलवाहिन्या टाकण्यात येणार आहे. त्याशिवाय, हेडवर्क्सच्या कामासाठी देखील निविदा प्रसिद्ध करण्याचे नियोजन आहे.