Saturday, 07 Sep, 9.31 am प्रभात

मुखपृष्ठ
भारताची पाकिस्तानवर मात

कोलंबो: सध्या श्रीलंकेमध्ये १९-वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धा सुरु आहेत. यामध्ये आज भारत पाकिस्तान सामन्यात भारतीय संघाने ६० धावांनी पाकिस्तानवर मात करत दमदार विजय मिळवला आहे.

नाणे फेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत ३०५ धावांचा डोंगर उभा केला होता. त्याचा पाठलाग करत असताना पाकिस्तानचा डाव २४५ धावांमध्येच संपुष्टात आल्याने. भारताने ६० धावांनी पारंपरिक प्रतिस्पर्धी संघाला पराभूत केलं आहे.

भारताच्याअर्जुन आझाद आणि तिलक वर्मा यांनी १८३ धावांची भागीदारी करून संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला. यामध्ये अझादने ११ चौकार आणि ४ षटकार लगावत १२१ धावा केल्या. तर वर्माने १० चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ११० धावा केल्या.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top