Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त; एका वैमानिकाचा मृत्यू

भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त; एका वैमानिकाचा मृत्यू

प्रभात 5 years ago

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर जम्मू काश्मीर आणि पंजाबच्या सीमारेषेवर दुर्घटनाग्रस्त झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. कठुआ जिल्ह्यातील लखनपूर येथे ही दुर्घटना घडली आहे. हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिक होते. दोघांनाही जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एका वैमानिकाची प्रकृती गंभीर असून दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

HAL Dhruv हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालेले असून यामागे तांत्रिक कारण असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे हेलिकॉप्टर पठाणकोट येथून येत होते. कठुआचे एसएसपी शैलैंद्र मिश्रा यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरला जिल्ह्यातील लखनपूर परिसरात लष्कराच्या जागेवर क्रॅश लँडिंग करावे लागले.

दुर्घटनेच दोन वैमानिक जखमी झाले होते, त्यांना तात्काळ लष्कर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते अशी माहितीदेखील त्यांनी दिली आहे. एका वैमानिकाचा मृत्यू झाल्याची माहिती संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat