Friday, 07 May, 6.29 pm प्रभात

मुखपृष्ठ
भिका-भीमा सांगवीकर तमाशा मंडळास निळकंठ, जेधेवाडी ग्रामस्थांकडून मदतीचा हात

भोर - गेल्या वर्षीपासून महाराष्ट्रावर करोना संसर्गाचे संकट आहे. या संसर्गाचा प्रत्येकाला फटका बसला. हातावर पोट असलेल्या लोक कलावंतांनाही या महामारीचा जोरदार फटका बसला आहे. संसर्गामुळे गावातील यात्रा उत्सव बंद झाले. गावातील यात्रांवर अवलंबून असलेल्या तमाशा कलावंतांची मोठी उपासमार होत आहे. त्यामुळे या कलावंतांना मदत म्हणून निळकंठ आणि जेधेवाडी येथील ग्रामस्थांनी वर्गणी करून भिका-भीमा सांगवीकर तमाशा मंडळास 51 हजार रुपये आणि 6 पोती धान्य देण्यात आले. हे तमाशा मंडळ या गावांमध्ये गेली 40 वर्षांपासून लोककला सादर करत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top