Dailyhunt
भोर तालुक्‍यात जडी-बुटी सप्ताह सुरू

भोर तालुक्‍यात जडी-बुटी सप्ताह सुरू

प्रभात 5 years ago

भोर -पतंजली योगपीठ हरिद्वार या संस्थेच्या किसान सेवा समितीतर्फे भोर तालुक्‍यात येत्या 30 दिवसांत 5 हजार औषधी वनस्पतींची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती किसान सेवा समितीचे जिल्हा प्रभारी यशवंत भेलके यांनी सांगीतले.

या उपक्रमाचा शुभारंभ भोर पोलीस स्टेशनच्या प्रांगणात पोलीस निरीक्षक राजू मोरे यांचे हस्ते जागतिक वृक्ष दिनाच्या दिवशी करण्यात आला.

पतंजली योग पीठ हरीद्वार संस्थेचे महामंत्री आचार्य बालकृष्णजी यांच्या जन्म दिनी व जडी-बुटी दिनाचे औचित्य साधून मंगळवार (दि. 4) पासून पुणे जिल्ह्यात एका महिन्यात 25 हजार औषधी वनस्पतींची लागवड करण्यात येणार असून, 5 हजार झाडांची भोर तालुक्‍यातलागवड केली जाणार असल्याचे यशवंत भेलके यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat