Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भोरच्या उपनगराध्यक्षपदी अनिल पवार बिनविरोध

भोरच्या उपनगराध्यक्षपदी अनिल पवार बिनविरोध

प्रभात 6 years ago

भोर -येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी अनिल नारायण पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती सभेच्या अध्यक्षा तथा नगराध्यक्षा निर्मला आवारे यांनी दिली.

मावळते उपनगराध्यक्ष गणेश पवार यांचा एक वर्षाचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. रिक्‍त झालेल्या पदावर अनिल पवार यांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा निर्मला आवारे यांच्यासह कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. निवडीनंतर अनिल पवार यांचा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात भोर नगरपालिका प्रशासनाचे वतीने मुख्याधिकारी डॉं, विजयकुमार थोरात यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

अनिल पवार म्हणाले, भोर नगरपालिकेवर आमदार थोपटे यांनी माझी पत्नी शुभांगी पवार हिला मागील पंचवार्षिकमध्ये नगर सेविका होण्याचा मान दिला होता.

यावेळी मला उपाध्यक्षपदाचा बहुमान दिला असल्याने त्यांचा विश्‍वास सार्थ करुन भोरच्या जनतेला पिण्याचे पाणी, आरोग्य व इतर अनुषंगीक सर्व सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न राहील.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat