Dailyhunt
बिगबॅश स्पर्धेत किम गार्थचा विक्रम

बिगबॅश स्पर्धेत किम गार्थचा विक्रम

प्रभात 4 years ago

मेलबर्न -ऑस्ट्रेलियात महिलांची बिग बॅश क्रिकेट लीग सुरु आहे. या स्पर्धेतील मेलबर्न स्टार्स आणि सिडनी थंडर या सामन्यात एका विक्रमाची नोंद झाली आहे. मेलबर्न स्टार्सची गोलंदाज किम गार्थने भेदक गोलंदाजी करत तीन गडी बाद केले.

विशेष म्हणजे तिने तिन्ही षटके निर्धाव टाकली.

किम गार्थ आयर्लंडची क्रिकेटपटू आहे. तिने मेलबर्न स्टार्सकडून खेळताना पहिल्या षटकात दोन गडी बाद केला. पहिल्या षटकाच्या सुरुवातीच्या चार चेंडूवर दोन फलंदाजांना बाद केले. ताहिलिया विल्सन आणि फीब लिचफिल्ड यांना शुन्यावरच तंबूत परतावे लागले.

गार्थचे दुसऱे षटक निर्धाव ठरले. मात्र, तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा गार्थने कॉरिन हॉल बाद करत हे षटकही निर्धाव टाकले.

गार्थने आतापर्यंत 34 एकदिवसीय सामन्यात 448 धावा केल्या आहेत. तसेच 23 गडी बाद केले आहे. तसेच 51 टी-20 सामन्यात 762 धावा केल्या आहेत. तसेच 42 गडी बाद केले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat