Bipasha Basu : बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र आई झाल्यानंतर तिने सिनेसृष्टीतून ब्रेक घेतल्याचे दिसते.
अलीकडेच बिपाशाने मुंबईतील एका फॅशन शोमध्ये हजेरी लावली.
फॅशन वीक फेस्टिव्हलमध्ये तिने रॅम्पवॉकही केला. सध्या तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिने पुन्हा एकदा आपल्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. Bipasha Basu
या फॅशन शोसाठी बिपाशाने खास लूक केला होता. बिपाशाने लाल रंगाच्या लेहेंग्यात नववधूसारखा लूक केला होता. बिपाशाने नवरीसारखे दागिनेही घातले होते. केसांचा बन बांधून त्यात फुलं माळली होती. तिच्या रॅम्पवॉकने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. Bipasha Basu
मात्र वाढलेलं वजन आणि सुजलेला चेहरा पाहून काहींनी बिपाशाला ट्रोल केलं आहे. तर अभिनेत्रीचा आत्मविश्वास पाहून काही जण तिचं कौतुकही करत आहेत. Bipasha Basu
बिपाशाच्या व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया Bipasha Basu
बिपाशाच्या व्हिडीओवर अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. “ड्रेस खूप जड असेल मानलं पाहिजे”, “खूप सुंदर दिसतेय” अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
तर काहींनी तिला ट्रोलही केलं आहे. “काकूबाई दिसते”, “नीट चालताही येत नाही” असंही अनेकांनी म्हणत तिच्या वर टीका केली आहे.
बिपाशाबद्दल बोलायचे झाले तर, तिने मॉडेलिंगमधून करिअरला सुरुवात केली. २००१ मध्ये ‘अजनबी’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले.
यानंतर तिने ‘राज’ (२००२), ‘जिस्म’ (२००३), ‘नो एंट्री’ (२००५) आणि ‘धूम २’ (२००६) सारख्या सुपरहिट चित्रपटांद्वारे स्वतःची ओळख निर्माण केली. बिपाशाने २०१६ मध्ये अभिनेता करण सिंग ग्रोव्हरशी लग्न केले आणि २०२२ मध्ये ती एका मुलीची आई झाली. Bipasha Basu

