Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बिर्ला हॉस्पिटलच्या स्टाफनर्सचा संप अखेर मागे

बिर्ला हॉस्पिटलच्या स्टाफनर्सचा संप अखेर मागे

प्रभात 6 years ago

पिंपरी - प्रलंबित मागण्यांकरिता आदित्य बिर्ला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा सुरु असलेला बेमुदत संप रविवारी सायंकाळी मागे घेण्यात आला. आमदार महेश लांडगे यांच्या मध्यस्थीने रुग्णालय प्रशासनाशी झालेल्या चर्चेनंत हा संप मागे घेत, आंदोलनकर्ते कर्मचारी रविवारी (दि.9) कामावर रुजू झाले. यामुळे रुग्णालयातील सेवा आता पूर्ववत सुरु झाली आहे.

करोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच आदित्य बिर्ला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला होता. त्यामुळे आरोग्य सुविधेवर ताण येऊ लागला. रुग्णांची हेळसांड होऊ नये, याकरिता भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत, त्यांचे म्हणने ऐकून घेतले.

यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्‍त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनीही सकारात्मक भूमिका घेतली. तर रुग्णालय प्रशासनाच्या वतीने मुख्यकार्यकारी अधिकारी रेखा दुबे या उपस्थित होत्या. कर्मचारी प्रतिनिधी आणि रुग्णालय प्रशासन अधिकारी यांच्यात बैठक घेण्यात आली. आमदार लांडगे यांच्या आवाहनास प्रतिसाद देत, संप मागे घेतला.

92 स्टाफ नर्स कामावर रुजू
या आंदोलनात एकूण 92 रुग्णसेवक व रुग्णसेविका सहभागी झाल्या होत्या. गेली सहा दिवसांपासून सुरु असलेल्या या संपात आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम होते. मात्र आंदोलक व प्रशासन प्रतिनिधींमध्ये चर्चा होत नसल्याने पाच दिवस कोणतीही कृती झाली नाही. त्यानंतर आमदार महेश लांडगे यांच्या मध्यस्थीने आंदोलकांच्या मागण्यांवर समाधानकारक चर्चा झाल्यानंतर सहाव्यादिवशी हा संप मागे घेत, 92 कर्मचारी कामावर रुजू झाले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat