Sunday, 19 Jan, 1.30 pm प्रभात

मुख्य पान
'बुलडाणा अर्बन' सोसायटी'ची चौफेर प्रगती

पुण्यातील प्रभात रोड शाखेचा 12 वा वर्धापनदिन उत्साहात

पुणे - बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची प्रभात रोड शाखा आपला बारावा वर्धापन दिवस साजरा करत आहे. बुलडाणा अर्बनच्या महाराष्ट्राबरोबरच गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा, तेलंगणा, सीमांध्र, अंदमान व निकोबार ठिकाणी 453 शाखा आहेत. एकूण ठेवी 7,872 कोटी आणि एकूण कर्ज 5,743 कोटी रुपयांचे आहे, अशी माहीती सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे यांनी दिली.

शेतकऱ्यांना धान्य साठवण्यासाठी मदत व्हावी, याकरिता सोसायटीने 355 गोडाऊन व बरीच शीतगृहे उभारली आहेत. राधेश्‍याम चांडक यांनी 1986 मध्ये बुलडाणा अर्बनची स्थापना केली.

महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांना तीर्थयात्रेसाठी जाताना मदत व्हावी, याकरिता तिरुपती, शिर्डी, कोल्हापूर, माहूर इत्यादी ठिकाणी भक्त निवास उपलब्ध केले आहे. बुलडाणा अर्बनने आणखी एक घेतलेला महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणजे सेंद्रिय उत्पादनाची उपलब्धता. पुण्यातील अष्टांग आयुर्वेद ईमारत, टिळक रोड पूर्ण जैविक स्टोअर उभारले आहे.

शिरीष देशपांडे म्हणाले, राधेश्‍याम चांडक यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार आम्ही जनतेला सहकाराच्या माध्यमातून मदत करण्यात यशस्वी झालो आहोत. बुलडाणा अर्बनने महिला सबलीकरणासाठी मायक्रोफायनान्स योजना सुरू केलेली आहे. याकरिता बुलडाणा अर्बन मॅनेजमेंट सर्व्हिसेस नावाची वेगळी संस्था उभा करण्यात आली असून या संस्थेचे मुख्य कार्यपालन अधिकारी स्वप्नील वानखेडे आहेत.

पश्‍चिम महाराष्ट्रातही विस्तार
बुलडाणा अर्बनने पश्‍चिम महाराष्ट्रातही आपले कार्यक्षेत्र विस्तारले आहे. बुलडाणा अर्बनची पुण्यातील प्रभात रोड शाखा 365 दिवस कार्यरत असते. सोसायटीच्या पुण्यामध्ये प्रभात रोड, पौड रोड,औंध, मार्केट यार्ड, शनिपार येथे, पिंपरी-चिंचवड विभागात चिंचवड, भोसरी, आळंदी, चाकण, शिक्रापूर, काळेवाडी, नवी सांगवी, चिखली येथे शाखा आहेत. साताऱ्यात सातारा, फलटण, बारामती, लोणंद, कोरेगाव, मसवड, मसूर, वाई, कराड दहिवडी, सातारा -महिला, उंब्रज येथे शाखा आहेत.

राधेश्‍याम चांडक यांनी 1986 मध्ये बुलडाणा अर्बनची स्थापना केली. त्यानंतर बुलडाणा अर्बनने आपला कार्यविस्तार अनेक राज्यांत केला आहे. विशेष म्हणजे, बुलडाणा अर्बन कर्ज देताना कसल्याही दबावाला बळी पडत नाही. त्याचबरोबर कर्ज घेणाऱ्याची व्यवस्थित चौकशी करून कर्ज दिले जाते. त्यामुळे बुलडाणा अर्बनचे ढोबळ व निव्वळ एनपीए 3%पेक्षा कमी आहे.
- शिरीष देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top