Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
चंद्रकांत पाटलांचं शरद पवारांना आव्हान

चंद्रकांत पाटलांचं शरद पवारांना आव्हान

प्रभात 5 years ago

कोल्हापूर: शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमधून अनेक खुलासे होत आहेत. दरम्यान शरद पवार यांच्या निवडणुकीतील निकालाच्या वक्तव्यांवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सडकून टीका केली.

निवडणुका लागतील तेव्हा चारही पक्षांनी स्वतंत्र लढून आपला जनाधार दाखवून देऊ असं आव्हान चंद्रकांत पाटलांनी पवारांना दिलं आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वेगळे लढले असते, तर त्यांच्या राज्यात राष्ट्रवादीला 20 आणि काँग्रेसला 10 जागाच आल्या असत्या. तुम्ही एकत्र लढूनही तुमच्या एकूण 98 जागा निवडून आल्या आणि आमच्या एकट्याच्या 105 निवडून आल्या आहेत.

संजय राऊत सरकार पाडून दाखवा असं म्हणत आहेत, पण सरकार पाडण्यात आम्हाला इंटरेस्ट नसल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat