Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'चांद्रयान-2'च्या कहाणीची अद्याप अखेर झालेली नाही- इस्रो

'चांद्रयान-2'च्या कहाणीची अद्याप अखेर झालेली नाही- इस्रो

प्रभात 6 years ago

नवी दिल्ली - सर्व भारताचे लक्ष लागलेल्या चांद्रयान-2 मोहिमेदरम्यान चंद्राच्या पृष्ठभागावर 'विक्रम लँडर'चे सॉफ्ट लँडिंग न झाल्याने इस्रो बरोबर सर्च भारतीयांना मोठा धक्का बसला होता.

दरम्यान, अपयश झटकून इस्रो पुढच्या तयारीला लागली आहे. 'चांद्रयान-2 च्या कहाणीची अद्याप अखेर झालेली नाही. भविष्यात चंद्राच्या पृष्टभागावर सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील'. अशी माहिती इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी दिली.

'अखेरच्या टप्प्यात मोहिमेला अपयश आले असले तरी आमच्याकडे खूप मह्त्त्वपूर्ण माहिती गोळा झालेली आहे. आता भविष्यात इस्रो आपला अनुभव आणि तांत्रिक खबरदारीच्या जोरावर सॉफ्ट लँडिंगसाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल'.

असा विश्वास सिवन यांनी यावेळी व्यक्त केला. ते राजधानी दिल्लीमध्ये बोलत होते.

दरम्यान, जेव्हा विक्रमचा संपर्क तुटला त्यावेळी तो चंद्राच्या पृष्ठभागापासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर होता. त्यावेळी त्याचा वेग प्रतिसेकंद 60 मिटर होता.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat