Saturday, 07 Sep, 9.47 am प्रभात

मुखपृष्ठ
चांद्रयान २ : देशाला इस्रोचा अभिमान; राजकीय नेत्यांचे ट्विट

श्रीहरीकोटा - चंद्रावर अंतराळ उतरवण्याच्या महत्त्वाकांक्षी 'चांद्रयान-2'मोहिमेचे 'विक्रम' लॅंडर चंद्रावर उतरवण्याच्या काही मिनिटे आगोदर काही तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे 'विक्रम' लॅंडरकडून सिग्नल पाठवले जाणे थांबवले गेले. नियोजित वेळेच्या काही मिनिटे अगोदरपासून 'विक्रम' लॅंडरची स्थिती काय आहे, हे श्रीहरीकोटा येथील शास्त्रज्ञांना समजू शकले नव्हते. यामुळे शास्त्रज्ञ निराश झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज नेते शास्त्रज्ञांचा प्रोत्साहित करत आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हंटले कि, देशाला इस्रोचा अभिमान आहे, असे त्यांनी ट्विट केले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ट्विट केले कि, चांद्रयान -२ च्या आतापर्यंतच्या प्रवासासाठी इस्रोच्या कर्तृत्वाचा प्रत्येक भारतीयांना अभिमान आहे. देशवासी इस्रोच्या वैज्ञानिकांसोबत आहे. भावी वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले कि, चांद्रयान -२ अभियानाबद्दल इस्रोच्या टीमचे अभिनंदन. आपली उत्कटता आणि समर्पण प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणास्थान आहे. तुमचे काम व्यर्थ जाणार नाही. या मिशनने अनेक महत्त्वाकांक्षी अवकाश अभियानांचा पाया रचला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top