Monday, 22 Jul, 6.38 am प्रभात

मुखपृष्ठ
'चांद्रयान-2' यशस्वी, प्रत्येक भारतीयासाठी गर्वाचा क्षण - रामनाथ कोविंद

नवी दिल्ली - भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आज (ता.22) ऐतिहासिक कामगिरी करत 'चांद्रयान-2'चे यशस्वी प्रक्षेपण केले. दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून 'चांद्रयान-2'ने अवकाशात झेप घेतली. यांनतर देशभरातून इस्रोच्या शास्त्रज्ञांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनीही इस्रोचे अभिनंदन केले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 'चांद्रयान-2' चे ऐतिहासिक प्रक्षेपण हा प्रत्येक भारतीयासाठी हा मोठा गर्वाचा क्षण असल्याचे म्हटले आहे. पूर्णपणे भारतीय बनावटीच्या चांद्रयान-2 चे यशस्वी प्रक्षेपण केल्याबदल त्यांनी इस्रोतील सर्वच शास्त्रज्ञांचे अभिनंदनही केले आहे. तसेच इस्रोला पुढील मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

चांद्रयान-2 हे पहिलेच यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अतिशय जवळ 50 दिवसांनी उतरेल. या मोहिमेतून नाविन्याचा शोध आणि आपल्या ज्ञान प्रणालीमध्ये भर पडणार आहे. माझ्याकडून चांद्रयान-2 च्या टीमला शुभेच्छा, असे ट्विट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top