Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Child Abuse and Murder : काळजाचा थरकाप! ३ वर्षांच्या चिमुरड्यावर अत्याचार करून क्रूर हत्या; १२ तासांत नराधम जेरबंद

Child Abuse and Murder : काळजाचा थरकाप! ३ वर्षांच्या चिमुरड्यावर अत्याचार करून क्रूर हत्या; १२ तासांत नराधम जेरबंद

प्रभात 2 months ago

Child Abuse and Murder - खेड तालुक्‍यातील खालुंब्रे गावात माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. अवघ्या ३ वर्षांच्या निष्पाप बालकावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून त्याची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली.

महाळुंगे पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अल्पवयीन आरोपीला पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले आहे.

​शुक्रवारी (दि. १ मे) रोजी दक्षिण महाळुंगे परिसरातून एक तीन वर्षांचा मुलगा आपल्या घरासमोर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला. पालकांनी आजूबाजूला शोध घेऊनही मुलगा न सापडल्याने त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली. तपासादरम्यान शेजारील एका बंद खोलीत एका बॅगेमध्ये या चिमुरड्याचा मृतदेह आढळून आला.

​प्रथमदर्शनी, या बालकावर लैंगिक अत्याचार करून धारदार शस्त्राने गळा कापून त्याची क्रूर हत्या केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​गुन्ह्याचे संवेदनशीलता लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथके रवाना करण्यात आली. तांत्रिक माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना संशयित आरोपीची माहिती मिळाली.

संशयित हा मूळचा बिहारचा रहिवासी असून तो स्वतः अल्पवयीन बालक असल्याचे समोर आले. ​आरोपी बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच, पोलिसांनी पुणे रेल्वे स्टेशनच्या बाहेर सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. महावरकर, अप्पर आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली, उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक अनिल देवडे व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat