Monday, 10 Aug, 6.16 am प्रभात

ताज्या बातम्या
"छोडो भारत'चे पूर्ण उद्दिष्ट जाणून घेण्यासाठी "भारत जोडो'ची आवश्‍यकता

मुंबई - सशक्त, भावनिकदृष्ट्‌या एकात्मिक भारत म्हणजे विघातक शक्तींपासून बचाव, आहे त्यासाठी भारत जोडण्याच्या चळवळीची आवश्‍यकता असल्याचे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. 'छोडो भारत' चळवळीच्या 78 व्या वर्धापनदिनी, नायडू यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून देशावर 1000 ते 1947 दरम्यान एकतेच्या अभावामुळे झालेली परकीय आक्रमणे आणि वसाहतवादी शोषण याविषयी लिहिले आहे. एकेकाळी समृद्ध असलेल्या भारताने दीर्घकाळ सांस्कृतिक अधीनता आणि आर्थिक शोषणाच्या रुपाने मोठी किमंत चुकवली आहे, असे ते म्हणाले.

1947 मध्ये मोठ्या संघर्षाने मिळालेले स्वातंत्र्य केवळ 200 वर्षांच्या वसाहतवादाचा शेवट नव्हते तर 1000 वर्षांपासूनच्या प्रदीर्घ काळोखावरील पडदा होता, या काळात आक्रमण करणाऱ्या, व्यापारी आणि वसाहतवाद्यांनी भारतीयांमध्ये एकात्मता नसल्याचा फायदा घेतला.

एकात्मतेच्या अभावामुळे दीर्घकाळापर्यंत भारताचे शोषण झाले. यापासून शिकत, सर्व भारतीयांनी आपापली सांस्कृतिक मूल्ये आणि संस्कृतींचा पाठपुरावा करताना भारतीयत्वाच्या सामायिक भावनेने बांधले जाणे आवश्‍यक आहे. हे राष्ट्रवादाची भावना रुजवण्यासारखे आहे. विभाजित भारताची धारणा आपल्याला अडचणीत आणणाऱ्यांसाठी सोपे लक्ष्य ठरेल. तर, सशक्त, एकत्रित आणि भावनात्मकदृष्ट्‌या एकात्मिक भारत आपल्यावर दुष्ट नजर ठेवणाऱ्यांपासून संरक्षण करेल, असेही उपराष्ट्रपती नायडू म्हणाले,

परकीय आक्रमणांचा परिणाम
सर्वांना समानता आणि सर्वांसाठी समान संधी मिळवून भारताला एका धाग्यात विणणे आवश्‍यक आहे यावर नायडू यांनी भर दिला आणि एक विभाजित, अप्रामाणिक समाज सर्व भारतीयांचा पूर्ण क्षमतेने विकास करु शकत नाही.

गेल्या 1000 वर्षांपासून देशाच्या संपत्तीवर झालेल्या परकीय आक्रमणांचा झालेला परिणाम सांगताना नायडू यांनी सोमनाथ मंदिराचा संदर्भ दिला आणि मंदिराच्या पुनर्निर्मितीसाठी 925 वर्षे लागली आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर याचे बांधकाम पूर्ण झाले, तसेच अयोध्येतील मंदिरासाठी 500 वर्षे लागली, ज्याचा नुकताच पाच ऑगस्ट रोजी भूमीपूजन सोहळा झाला, असे सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top