Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
CJP Protest : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर कारवाई होणार; सीजेपी आंदोलकांबाबत दिल्‍ली सरकारचा निर्णय

CJP Protest : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर कारवाई होणार; सीजेपी आंदोलकांबाबत दिल्‍ली सरकारचा निर्णय

CJP Protest : नीट पेपर फुटीच्या विरोधात झालेल्या सीजेपी आंदोलकांवर (CJP Protest) कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही. मात्र, ज्यांच्यावर आधीच गुन्हेगारी खटले प्रलंबित आहेत किंवा ज्यांनी हिंसाचार व तोडफोड केली आहे, अशा आंदोलकांना कोणताही दिलासा दिला जाणार नाही, असे दिल्लीचे गृहमंत्री आशिष सूद यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

दिल्ली पोलिसांनी २९ जुलै २०२६ पर्यंत एकूण १३ एफआयआर नोंदवले होते. दिल्ली सरकारने म्हटले आहे की, आंदोलनांशी संबंधित प्रकरणांमध्ये कोणतीही पुढील प्रतिकूल कारवाई केली जाणार नाही.

सरकारने कोणतीही पुढील कारवाई (CJP Protest) न करता संपूर्ण प्रकरण बंद मानण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या सीजेपी आंदोलकांच्या प्रकरणांचा आढावा घेतला जाईल आणि सुटकेची प्रक्रिया लवकरच सुरू होईल.

दिल्ली सरकारने हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या (CJP Protest) २८ जुलै २०२६ च्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर घेतला आहे. नायब राज्यपालांच्या मंजुरीनंतर गृह विभागाने हा आदेश जारी केला आहे. तथापि, ही सवलत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना लागू होणार नाही. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन केले जाईल, असे स्‍पष्‍ट करण्‍यात आले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat