Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Commonwealth Games : कॉमनवेल्थ गेम्सपूर्वी भारताला मोठा धक्का ! 'ही' खेळाडू डोपिंग टेस्टमध्ये अडकली

Commonwealth Games : कॉमनवेल्थ गेम्सपूर्वी भारताला मोठा धक्का ! 'ही' खेळाडू डोपिंग टेस्टमध्ये अडकली

Commonwealth Games : गेल्या काही वर्षांत भारतीय क्रीडाक्षेत्राने जागतिक पातळीवर मोठी प्रगती केली असून, वेगवेगळ्या खेळांमध्ये (Commonwealth Games) खेळाडूंनी देशाचा नावलौकिक वाढवला आहे.

मात्र, या यशाच्या आलेखाला डोपिंगचे (उत्तेजक द्रव्य सेवन) ग्रहण लागताना दिसत आहे.

दरवर्षी देशातील एखादा मोठा खेळाडू डोपिंग चाचणीत अपयशी ठरत असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा डागाळत आहे. आता या दुर्दैवी यादीत भारताची अव्वल मध्यम पल्ल्याची धावपटू (Commonwealth Games) केएम दीक्षा हिचे नाव जोडले गेल्याने क्रीडा वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सँपलमध्ये आढळले प्रतिबंधित ‘स्टॅनोजोलोल’

‘द ट्रिब्यून’च्या वृत्तानुसार, राष्ट्रीय विक्रमवीर धावपटू केएम दीक्षा हिची घेण्यात आलेली डोपिंग चाचणी पॉझिटिव्ह आली असून, तिला यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आली आहे. दीक्षाच्या रक्ताच्या/मूत्राच्या नमुन्यात ‘स्टॅनोजोलोल’ हा प्रतिबंधित पदार्थ आढळून आला आहे.

हा पदार्थ ‘वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सी’च्या आणि ‘नाडा’च्या प्रतिबंधित औषधांच्या यादीत समाविष्ट आहे. स्नायूंची ताकद आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी अनेकदा खेळाडू बेकायदेशीरपणे याचा वापर करतात.

४ वर्षांची बंदी आणि ग्लासगो कॉमनवेल्थला मुकण्याची शक्यता

सध्या दीक्षावर अंतिम कारवाई किंवा तात्पुरती बंदी घालण्यात आलेली नाही. परंतु, नियमांनुसार पुढील सुनावणीत जर ती दोषी आढळली, तर तिच्यावर चार वर्षांपर्यंतची कडक बंदी लादली जाऊ शकते. असे झाल्यास तिचे करिअर धोक्यात येईलच, शिवाय आगामी ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्स मधील भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे तिचे स्वप्नही भंगणार आहे. पदक विजेत्या खेळाडूच्या अशा कामगिरीमुळे भारताचे मोठे नुकसान झाले आहे.

२०२५ मध्ये मोडला होता हरमिलन बँसचा राष्ट्रीय विक्रम

केएम दीक्षा ही भारताची अत्यंत आशादायक ॲथलीट मानली जाते. तिने २०२५ मध्ये लॉस एंजेलिस येथे झालेल्या ‘साउंड रनिंग ट्रॅक फेस्ट’मध्ये १५०० मीटर शर्यतीत इतिहास घडवला होता.

दीक्षाची कामगिरी: ४:०४.७८ मिनिटे (नवीन राष्ट्रीय विक्रम)
जुना विक्रम: ४:०५.३९ मिनिटे (हरमिलन बँसच्या नावावर असलेला विक्रम दीक्षाने मोडला होता)

या ऐतिहासिक कामगिरीनंतर दीक्षाकडून देशाला मोठ्या आशा होत्या, मात्र आता डोपिंगच्या या गडद सावटामुळे तिच्या क्रीडा कारकिर्दीसमोर (Commonwealth Games) मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat