Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Congress MLA : मोठी बातमी..! काँग्रेस आमदारासह १६ जणांना जन्मठेप, काय आहे प्रकरण?

Congress MLA : मोठी बातमी..! काँग्रेस आमदारासह १६ जणांना जन्मठेप, काय आहे प्रकरण?

प्रभात 1 month ago

Congress MLA : कर्नाटकातील गाजलेल्या योगेश गौडा हत्या प्रकरणात विशेष न्यायालयाने मोठा निर्णय देत काँग्रेसचे विद्यमान आमदार विनय कुलकर्णी यांच्यासह १६ जणांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

या सर्व आरोपींना प्रत्येकी ३० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या निकालामुळे देशभरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (Congress MLA)

हे प्रकरण १५ जून २०१६ रोजी धारवाड येथे घडले होते. भाजपचे जिल्हा पंचायत सदस्य योगेश गौडा गौडर यांची त्यांच्या जिममध्येच सुपारी देऊन हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर गौडर कुटुंबीयांनी न्यायासाठी जोरदार मागणी केल्याने २०१९ मध्ये तत्कालीन भाजप सरकारने हा तपास सीबीआयकडे सोपवला. (Congress MLA)

सीबीआयने २०२० मध्ये पुरवणी आरोपपत्र दाखल करत विनय कुलकर्णी यांना मुख्य आरोपी म्हणून नामनिर्देशित केले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. पुढे ऑगस्ट २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने काही अटींसह त्यांना जामीन मंजूर केला होता, ज्यामध्ये धारवाड जिल्ह्यात प्रवेशावर बंदीही घालण्यात आली होती.

दीर्घकाळ चाललेल्या सुनावणीनंतर अखेर विशेष न्यायालयाने हा महत्त्वाचा निकाल दिला असून, या प्रकरणाने पुन्हा एकदा राजकीय हिंसाचाराचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. (Congress MLA)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat