Friday, 11 Jun, 3.53 pm प्रभात

मुखपृष्ठ
CoronaVaccine : भारत बायोटेकच्या 'कोवॅक्सिन' लसीला अमेरिकेत परवानगी नाकारली

नवी दिल्ली - करोना संसर्गाविरुद्धच्या लढ्यात अग्रेसर असलेल्या कोवॅक्सिन लसीची निर्माता भारत बायोटेक कंपनीसंदर्भात निराशाजनक वृत्त आलं आहे. अमेरिकेत भारत बायोटेकच्या लसीच्या आपात्कालीन वापराला मंजुरी मिळू शकलेली नाही. तर भारतात कोवॅक्सिन लस पूर्ण क्षमतेने देण्यात येत आहे.

अमेरिकेच्या फूड अँड ड्रग एडमिनिस्ट्रेशन अर्थात एफडीएने भारत बायोटेकच्या कोविड लसीच्या आपात्कालीन वापरासंदर्भातील अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे अमेरिकेत कोवॅक्सिनच्या लॉन्चिंगसाठी विलंब होणार आहे. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन निर्मितीसाठीच्या अमेरिकेतील भागीदार ओक्युजेनने अमेरिकेतील एफडीएकडे पास मस्टर फाईल पाठवून कोवॅक्सिनच्या आपात्कालीन वापरासाठी परवानगी मागितली होती.

अमेरिकेने आपात्कालीन मंजुरी नाकारल्यानंतर ओक्युजेनच्या वतीने म्हटलं की, कोवॅक्सिनच्या वापरासाठी आता कंपनी संपूर्ण मंजुरीसाठी प्रयत्न करेल. अमेरिकेच्या एफडीएने कंपनीला लसीचे आणखी एकदा परिक्षण करण्याची सूचना केली आहे. जेणेकरून कंपनी बायोलॉजिकल परवान्यासाठी अर्ज करू शकले.

सध्या भारत बायोटेक कोव्हॅक्सिन लसीचे फेज-३ क्लिनिकल ट्रायल करत आहे. त्यांनी बुधवारी सांगितले की, याचा डाटा जुलैमध्ये जाहीर करू. ज्यानंतर कंपनी लसीच्या संपूर्ण परवान्यासाठी अर्ज करेल. पण सध्या कोव्हॅक्सिनला परदेशात मान्यता मिळविण्यात अडचणी येत आहेत, कारण जागतिक आरोग्य संघटनेला मंजूरीसाठी फेज-३चा डाटा पाहिजे.

एफडीएने भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनविषयी अधिक माहिती मागितली आहे. मात्र भारत ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI)ने आपल्या पहिल्या तीन टप्प्यांचा डेटा शेअर केला नाही. त्यामुळेच एफडीएने भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या वापरास मंजूरी दिली नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top