Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Corporator Salary : नगरसेवकांचे मानधन 1 लाख होणार? 'या' नगरसेविकेची मागणी, मुंबई महापालिकेत मुद्दा तापला

Corporator Salary : नगरसेवकांचे मानधन 1 लाख होणार? 'या' नगरसेविकेची मागणी, मुंबई महापालिकेत मुद्दा तापला

प्रभात 1 month ago

Corporator Salary : समाजवादी पक्षाच्या नगरसेविका अमरीन अब्राहानी यांनी मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे यांना पत्र लिहून नगरसेवकांच्या मानधनात मोठी वाढ करण्याची मागणी केली आहे.

सध्या मिळणाऱ्या मानधनात वाढ करून ते दरमहा 1 लाख रुपये करण्यात यावे, तसेच 15 ते 20 हजार रुपयांचा प्रवास भत्ता देण्यात यावा, अशी प्रमुख मागणी पत्रातून करण्यात आली आहे. (Corporator Salary)

अब्राहानी यांनी पत्रात नमूद केले की, 2017 पासून नगरसेवकांच्या मानधनात कोणतीही वाढ झालेली नाही. दुसरीकडे, मुंबई महापालिकेचे 2026-27 चे अंदाजपत्रक सुमारे 80,952 कोटी रुपयांचे असूनही नगरसेवकांना मर्यादित मानधन आणि सुविधा मिळतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. (Corporator Salary)

याशिवाय काही अतिरिक्त मागण्याही मांडण्यात आल्या आहेत. त्यामध्ये वैयक्तिक सहाय्यकासाठी 25 हजार रुपयांचा भत्ता, कुटुंबासह सर्वसमावेशक वैद्यकीय सुविधा, प्रभागात सुसज्ज कार्यालयीन जागा, सभागृहातील वक्तव्यांसाठी मर्यादित कायदेशीर संरक्षण आणि एक कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर निवृत्ती वेतन योजना यांचा समावेश आहे. (Corporator Salary)

पत्रातून आमदार आणि नगरसेवक यांच्या मानधनातील तफावतही अधोरेखित करण्यात आली आहे. आमदारांना दरमहा 1.60 ते 2.50 लाख रुपये मानधन मिळते, तर नगरसेवकांना सध्या सुमारे 25 हजार रुपयेच मिळतात. (Corporator Salary)

दरम्यान, नगरसेवक हे स्थानिक स्वराज्य संस्थेतील महत्त्वाचे दुवे मानले जातात. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, घनकचरा व्यवस्थापन यांसारख्या नागरी समस्यांवर ते थेट काम करतात. त्यामुळे त्यांच्या मानधन आणि सुविधांमध्ये वाढ करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायत आणि औद्योगिक नगरी अधिनियम 1965 नुसार नगरसेवकांचे मानधन शहराच्या श्रेणीनुसार ठरवले जाते. सध्या अ+ श्रेणीत 25 हजार, अ श्रेणीत 20 हजार, ब श्रेणीत 15 हजार, क श्रेणीत 10 हजार आणि ड श्रेणीत 7,500 रुपये इतके मासिक मानधन दिले जाते. तसेच विविध समित्यांच्या बैठकींसाठी 400 ते 500 रुपयांपर्यंत भत्ता दिला जातो. (Corporator Salary)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat