Sunday, 09 May, 7.37 pm प्रभात

महाराष्ट्र
Covid 19 Positive News | पालघरच्या 103 वर्षाच्या आजोबांनी करोनाला हरवले !

पालघर, दि. 9 - महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यातील 103 वर्षाच्या वृद्धाने आपल्या सक्षम मानसिकतेच्या आधारे करोनाला हरवून एक नवाच आदर्श निर्माण केला आहे. शामराव इंगळे असे त्यांचे नाव असून ते विरेंद्रनगरचे रहिवासी आहेत. त्यांना करोना झाल्याने पालघरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातून ते पूर्ण बरे झाल्यानंतर काल शनिवारी त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

या रुग्णालयातील डॉक्‍टरांनी सांगितले की त्यांनी वैद्‌कीय उपचारांना चांगला प्रतिसाद दिला. तसेच त्यांनी रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाहीं चांगले सहकार्य केले. त्यामुळेच ते यातून पुर्ण बरे झाले असून शनिवारी हसतमुखाने ते रुग्णालयातून घरी गेले. पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरूसाळ आणि हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला. त्यामुळे कितीही वय असलेल्या माणसाला करोना झाला तरी त्यातून तो निश्‍चीत बरा होऊ शकतो असा विश्‍वास त्यांनी अन्य व्यक्तिंमध्ये निर्माण केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top