Friday, 11 Jun, 1.00 pm प्रभात

ताज्या बातम्या
#covid vaccine : लस न घेणाऱ्या नागरिकांचं होणार सिम कार्डच 'बंद'

पाकिस्थान ( पंजाब )- सध्या देशासह संपूर्ण जगात करोनाचा प्रभाव झपाट्याने वाढत आहे. दररोजच्या करोना रुग्णांमुळे संपूर्ण जगातील देशांवर ताण आला आहे. करोनाच्या विळख्यातून बाहेर निघण्यासाठी सर्व देशांकडून लस आणि लसीकरणावर भर दिला जात आहे. मात्र लसीबाबत आताही लोकांमध्ये संभ्रम असून लस घेण्यास लोकांना कडून पाठ दाखवली जात आहे.

लसीकरणाबाबत नागरिकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण झाले आहेत. अश्यातच आता नागरिकांनी लवकरात लवकर करोना लस घ्यावी यासाठी सर्व देशातील सरकारकडून भन्नाट आयडिया लढविली जात आहे. काही ठिकाणी लास घेतल्यास बिअर मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे तर काही ठिकाणी सरकारकडून ऑफर, बक्षीस आणि कठोर नियम करुन नागरिकांना लस घेण्यास भाग पाडावं लागत आहे.

अशीच काहीशी परिस्थिती पाकिस्तानातही आहे. पाकिस्तानच्या पंजाबमध्ये सरकारनं लस न घेणाऱ्या नागरिकांचं सिम कार्डच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. यासमीन रशीद यांच्या अध्यक्षतेखाली लाहोरमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

याबाबत त्यांनी पुढे सांगितले आहे की,'राज्यात तीन लाख लोक असे आहेत, जे १ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्यासाठी परतलेच नाहीत. यामुळे, राज्य सरकारनं असा निर्णय घेतला आहे.'

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top