Monday, 15 Jul, 11.23 am प्रभात

मुख्य पान
#CWC19 : थरारक लढतीत इंग्लंड विश्वविजेता


अवघ्या क्रिकेट रसिकांचा श्वास रोखून धरलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये आज सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडसंघाने 'नियमानुसार' विजय मिळवत विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच विश्वचषक पटकावला. कमालीच्या चुरशीच्या ठरलेल्या या सामन्यामध्ये दोन्ही संघानी निर्धारित ५० षटकांमध्ये २४१ धाव केल्याने हा सामना सुपर ओव्हरपर्यंत पोहोचला होता. नियमाप्रमाणे सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना अतिरिक्त षटकामध्ये १५ धावा केल्या. बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांनी प्रत्येकी ३ चेंडूंमध्ये अनुक्रमे ८ व ७ धावा फटकावत न्यूझीलंडसमोर १६ धावांचे आव्हान ठेवले होते.

६ चेंडूंमध्ये १५ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडसंघाने देखील १५च धाव केल्या मात्र नियमानुसार ज्या संघाने सर्वाधिक चौकार/षटकार खेचले असतील त्या संघाला विजेता ठरविण्याचा नियम असल्याने इंग्लंडला विश्वविजेता घोषित करण्यात आले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top