Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दानवे यांच्या नेतृतवाखालील शिष्टमंडळ ग्राहक संरक्षण प्रकल्पासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर

दानवे यांच्या नेतृतवाखालील शिष्टमंडळ ग्राहक संरक्षण प्रकल्पासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर

प्रभात 6 years ago

नवी दिल्ली : सिडनी विद्यापीठाच्या अंतर्गत ऑस्ट्रेलिया-भारत संयुक्त ग्राहक संरक्षण प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी होण्यासाठी ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृतवाखाली उच्च स्तरीय शिष्टमंडळ आज ऑस्ट्रेलियाला रवाना झाले.

देशातील ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणाला केंद्र सरकारचे प्राधान्य आहे. अवैध व्यापार पद्धतींपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी संसदेने पारित केलेला ग्राहक संरक्षण कायदा 2019 हे या दिशेने मोठे पाऊल असल्याचे दानवे म्हणाले.

या कायद्यातील नियम आखण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून आंतरराष्ट्रीय पद्धती जाणून घेणे हा या दौऱ्याचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat