Dailyhunt
Delnaaz Irani : पोटगी नाकारून घेतला नवे आयुष्य जगण्याचा निर्णय; अभिनेत्री डेलनाज इराणी धक्कादायक खुलाशामुळे चर्चेत

Delnaaz Irani : पोटगी नाकारून घेतला नवे आयुष्य जगण्याचा निर्णय; अभिनेत्री डेलनाज इराणी धक्कादायक खुलाशामुळे चर्चेत

प्रभात 2 weeks ago

Delnaaz Irani : बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्री डेलनाज इराणी (Delnaaz Irani) हिने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे. त्यामुळे ही अभिनेत्री चर्चेत आली आहे.

अनेक सिनेमा आणि मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलेल्या डेलनाज गेल्या काही वर्षांपासून पडद्यापासून दूर आहे, असे असले तरी अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय असून, चाहत्यांसोबत सतत कनेक्ट असते.

अलीकडील एका मुलाखतीत अभिनेत्रीने घटस्फोटाबद्दल मोकळेपणाने भाष्य केले. 2010 साली तिने अभिनेता राजीव पौलपासून घटस्फोट घेत नात्याचा शेवट केला.

घटस्फोटानंतर तिने एक्स-पतीकडून कोणतीही पोटगी घेतली नाही, असे सांगितले. याविषयी सांगताना अभिनेत्री म्हणाली "कायदेशीर लढाईपेक्षा मला मन:शांती महत्त्वाची वाटली."

"आमचे नाते संपण्याआधीच आम्ही मानसिक आणि भावनिकदृष्ट्या दूर झालो होतो. काही गोष्टी आमच्यात जुळत नव्हत्या. नात्यात एकमेकांना गृहित धरण्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली." असा खुलासा डेलनाजने केला.

पुढे अभिनेत्री म्हणाली, " माझ्या डिक्शनरीमध्ये तलाक हा शब्द नव्हता. मी ज्या कुटुंबातून आले आहे, ते एक मिडल क्लास पारसी फॅमिली आहे. त्यामुळे हा निर्णय घेणे खूप कठीण होते आणि भावनिकदृष्ट्या खूप त्रास झाला." त्यावेळी डेलनाजने आपल्या आई-वडिलांनाही याची माहिती दिली नव्हती, असे देखील इतक्या वर्षांनी खुलासा करत तिने सांगितले.

नव्याने आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला

या नात्यात मला काहीच मिळाले नाही. घटस्फोट हा खूप वेदनादायक अनुभव असतो. पण शेवटी मी माझ्या मन:शांतीला प्राधान्य दिले आणि नव्याने आयुष्य सुरू करण्याचा निर्णय घेतला, असल्याचे देखील अभिनेत्री डेनलाज इराणेने सांगितले. (Delnaaz Irani )

वडिलांचे 2011 मध्ये निधन

अभिनेत्री डेलनाज इराणी घटस्फोटच्या दुःखातून सावरत असनाचा तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. तिच्या वडिलांचे 2011 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यामुळे अभिनेत्रीला मोठा धक्का बसला.

अभिनेत्री डेलनाज इराणी बॉलिवूड आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री आहे. तिने प्रामुख्याने कॉमेडी आणि सहाय्यक कलाकाराच्या भूमिका केल्या आहेत. (Delnaaz Irani )

डेलनाजची अभिनयशैली हलकी-फुलकी आणि मनोरंजक म्हणून लोकप्रिय आहे. कल हो ना हो, हमको दिवाना कर गये, येस बॉस अशा काही मोठ्या सिनेमात ती झळकली आहे.

Side Effects of Drinking Lassi: उन्हाळ्यात लस्सी पिताय? जास्त सेवन ठरू शकतं धोकादायक; जाणून घ्या मोठे साइड इफेक्ट्स

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat